अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

अंबाजोगाई पीपल्स बँकेकडून शिक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव

अंबाजोगाई (वार्ताहर):
शहरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सेवापुर्तीनिमित्त अंबाजोगाई पीपल्स बँकेकडून शुक्रवार,दिनांक ९ जुलै रोजी सेवागौरव करण्यात आला.

सहकार भवन येथील अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या हाॅलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई पीपल्स बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी,संचालक प्रा.वसंतराव चव्हाण,हाजी मेहमूद दादामियाँ,सचिन बेंबडे,योगेश्वरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन तथा नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक सुनील व्यवहारे,माजी नगरसेवक गणेश मसने,तालुका क्रिडा समन्वयक दत्ता देवकते,जावेद गवळी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.वनमाला रेड्डी,कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.अलका वालचाळे (सरोदे), योगेश्वरी महाविद्यालयातील प्रा.रत्नाकर बर्दापूरकर,गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी
कन्या शाळेचे अधिक्षक कमलाकर पसारकर,गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी
कन्या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक हरिदास बामणे,योगेश्वरी नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रमण सोनवळकर,जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सहशिक्षिका सरोज कुलकर्णी,मानव विकास विद्यालयाचे विशेष शिक्षक एस.एन.फड यांचा सेवानिवृत्तीबद्दल
गौरव करण्यात आला.तर यावेळी यूपीएससी मार्फत एनडीएच्या परीक्षेत २५० वी रँक प्राप्त करून भारतीय सैन्यदलात नेव्हीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी झालेले आर्यन चिकाळेकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला.सर्व मान्यवरांच्या सत्काराचे स्वरूप हे शाल,फेटा व वृक्षरोप असे होते.याप्रसंगी बोलताना चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले की,अंबाजोगाईच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून उपस्थित सर्वच मान्यवरांनी अंबाजोगाई शहराचे नांव उंचावले आहे.प्राचार्य,प्राध्यापक,सहशिक्षक,क्रीडाशिक्षक,अधिक्षक,
प्रयोगशाळा सहाय्यक आदी विविध पदांवर कार्यरत या मान्यवरांनी मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाईच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले आहे.याचा आम्हाला आनंद आहे.तर या प्रसंगी यूपीएससी मार्फत एनडीएच्या परीक्षेत २५० वी रँक प्राप्त करून भारतीय सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी झालेले आर्यन चेअरमन यांनी युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.या सर्व मान्यवरांचा अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला सार्थ अभिमान वाटतो.कारण,या मान्यवरांनी अंबाजोगाईचे नांव शिक्षण क्षेत्रात सर्वदूर पोहोचविले आहे असे चेअरमन मोदी म्हणाले.याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना माजी प्राचार्य डॉ.वनमाला रेड्डी म्हणाल्या की,अंबाजोगाईच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून सातत्याने होत आले आहे.अंबाजोगाई पीपल्स बँकेने आमच्या कार्याची नोंद घेऊन केलेल्या गौरवाबद्दल त्यांचे आभार.तर यावेळी बोलताना प्रा.डॉ.अलका वालचाळे (सरोदे) यांनीही अंबाजोगाई पीपल्स बँकेने केलेल्या सत्काराबद्दल धन्यवाद दिले.यावेळेस क्रीडा शिक्षक रमण सोनवळकर म्हणाले की,अंबाजोगाई पीपल्स बँक अंबाजोगाईकरांची हक्काची बँक आहे.या बँकेमुळे अर्थकारणाला गती मिळाली आहे.बँकेच्या वतीने आमचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे आभार.तसेच उच्चपदस्थ अधिकारी आर्यन चिकाळेकर यांनीही बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांचे आभार मानून सदर परीक्षेची कशा पद्धतीने तयारी केली,यश कसे संपादन केले याबाबतची विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय रापतवार यांनी करून उपस्थितांचे आभार नगरसेवक महादेव आदमाने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

Back to top button