घोसला ता.सोयगाव येथे वीस मिनिटाचा ढगफुटीचा पाऊस ;कपाशी पिकांचे नुकसान ,ठिबक सिंचन वरील कपाशी आडव्या

Last Updated by संपादक

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव मंडळातील घोसला ता.सोयगाव शिवारावर सोमवारी दुपारी वीस मिनिटाचा अचानक झालेल्या ढगफुटीच्या सदृश्य पावसाने खरिपाच्या पिकांच्या नुकसानीला बळी ठरविले आहे.आधीच पंधरा दिवसापासून गायब झालेल्या पावसाने तीन दिवसापासून सोयगाव परिसरात मुक्काम वाढविला असतांना मात्र सोमवारी घोसला शिवारावर ढगफुटीचा पावूस झाला आहे.त्यामुळे खरिपाच्या हन्मागातील पावसाने पहिले नुकसान घोसला गावात झाले आहे.

घोसला ता.सोयगाव शिवारावर सोमवारी सायंकाळी तब्बल वीस मिनिटे ढगफुटीचा पावूस झाला यामध्ये ठिबक सिंचन वर वाढलेल्या कपाशी पिके आडवी झाली असून वादळी वार्याचा जोरही या भागात मोठा होता.काही शेतातून पाणी शिरल्याने कपाशीचे झाडे वाहून गेली असून काही भागात पाण्याच्या जोरामुळे आडवी झाल्याचे चित्र आहे.या पावसात घोसला शिवारात तब्बल २०० हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कपाशीचे क्षेत्र अधिक-

घोसला शिवारात कपाशी पिकांचे क्षेत्र अधिक लागवडी खाली आहे.,मात्र या भागात झालेल्या मुसळधार पावसात या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कपाशीचे झाडे आडवी पडल्याने आता पुन्हा या पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागणार आहे.

नुकसानीचे पंचनामे करावे-

घोसला शिवारात झालेल्या ढगफुटीच्या वीस मिनिटाच्या पावसात होत्याचे नव्हते झाले आहे,पावसाचे वातावरण नसतांना अचानक झालेली या ढगफुटीच्या पावसात नुकसान झाले असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर युवरे यांनी सांगितले.