सोयगाव,ता.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शेतातील रस्त्याच्या जुन्या वादातून दोघांनी कोयत्याने सपासप वार करून तरुण शेतकर्याची हत्या तर महिला शेतकऱ्याला गंभीर केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली,या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात पिता पुत्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोयगाव शिवारात असलेल्या एका शेतातील रस्त्याच्या जुन्या वादाची धुसफूस शनिवारी दुपारी चव्हाट्यावर आली असतांना दुपारी दोघांमध्ये समजोता घातल्यानंतर पुन्हा सायंकाळी याच वादातून शेताजवळच सोयगाव ते लिहातांडा रस्त्यावर हमरीतुमरी झाल्यावरून शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी एकावर कोयत्याने तोंडावर,डोक्यावर,छातीवर सपासप वार करून मयताची पत्नी हि वाद सोडविण्यासाठी आडवी आली असता तिलाही हातावर आणि दंडावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सुनील आनंदा चौधरी(वय ४३) असे कोयत्याच्या वारमध्ये हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याचा उपचारादरम्यान जळगावला घेवून जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला आहे.मयताची गंभीर झालेली पत्नी मनीषा हि गंभीरअवस्थेत पाचोरा जि,जळगाव येथे उपचार घेत असून सुनीलचा रस्त्यातच मूत्यू झाला.या प्रकरणी मयताची पत्नी मनीषा चौधरी हिने रविवारी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि,ज्ञानेश्वर चौधरी(वय ५०)व त्यांचा मुलगा हेमंत चौधरी(वय २१)दोघे राहणार सोयगाव या दोघांनी माझे पती सुनील चौधरी यांना शेताच्या रस्त्याजवळ सोयगाव-लिहातांडा रस्त्यावर अडवून दुपारी झालेल्या व जुन्या रस्त्याच्या जाब विचारून त्यांचेवर सपासप कोयत्याने शरीराच्या विविध भागावर सपासप वार केले यामध्ये मागून येत असतांना वाद मोडण्यासाठी गेली असता त्यांनी माझ्यावर वार करून हातावर व दंडावर वार केले आहे.मनीषा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी ज्ञानेश्वर चौधरी व मुलगा हेमंत चौधरी यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या ज्ञानेश्वर चौधरी यास अटक केली तर मुलगा हेमंत चौधरी याला उपचारकामी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली आहे.शनिवारी सायंकाळी शेताच्या बाजूला रस्त्यावर झालेल्या वादात मयत सुनील चौधरी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पोलीस पथकांसह तातडीने घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत असलेल्या सुनील चौधरी यास सोयगाव ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉ,गोपाल देहाडे,डॉ.केतन काळे,डॉ.देशराज मीना यांचेसह आरोग्य पथकांनी उपचार केले व दोघांना तातडीने उपचारासाठी पाचोरा व जळगावला रवाना केले परंतु मयत सुनील चौधरी यांचा रस्त्यातच शनिवारी रात्री मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री उशिरा जळगाव वैद्यकीय सूत्रांकडून सुनील चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त होताच या प्रकरण दोघांविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे..घटनेमुळे सोयगाव पोलीस ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,संदीप चव्हाण,सागर गायकवाड,रोहन शिंदे,कविता मिस्तरी,शिवदास गोपाल,रवींद्र तायडे,आदी पुढील तपास करत आहे.