मुलभूत सुविधा नागरिकांना मिळत नसतीलतर नगरपंचायत असून काय खार घालायचा का ?

Last Updated by संपादक

महिलांचा पाटोदा नगरपंचायतीला निवेदन

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
नगरपंचायत अंतर्गत माऊलीनगर,रामकृष्णनगर येथे नागरिकांना वीज रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर नगरपंचायत असून काय खार घालायचा का ?
माऊलीनगर रामकृष्णनगर मधील महिलांचा पाटोदा नगरपंचायतला संत्पत सवाल.
वार्ड क्रमांक सहा मध्ये धड रस्ता नाही. नाल्या नाहीत, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, पाण्याचे डोहामुळे घाण पसरुन लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या वार्डात मुलभूत सुविधा या नागरिकांना मिळत नाही.सर्वत्र रस्ते खड्डेमय व चिकलमय झाल्याने येथील नागरिकांना चलने फिरणे फार अवघड झाले आहे.वयोवृध्द माणस, लाहान मुले येथे अनेक वेळेस पडल्याने हातापायाला दुखापत झाली आहे. पाटोदा नगरपंचायतीला अनेक वेळेस निवेदन देऊन सुध्दा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.यामुळे या भागातील नागरिकांना चिंता लागली आहे की माऊलीनगर,रामकृष्णनगर चिकल व खड्डे मुक्त होईल का ?
पाटोदा नगरपंचायतीने आता तात्काळ उपाययोजना कराव्यात नसता दहा दिवसानंतर आपल्या कार्यालय समोर. बेमुदत उपोषण करण्यात येईल इशारा निवेदनद्वारे या भागातील नागरिकांनी पाटोदा नगरपंचायतला देण्यात आला.
यावेळी.भाजपा महिला आघाडीच्या ता.अध्यक्ष सौ. वैशालीताई गिते ,सौ.चंद्रकला गर्जे, शिवसेना महिला आघाडीच्या ता.अध्यक्ष प्रतिभा वनवे,सौ.गंगा माने,सुनिता माने,मंगल मुंजाळ,उषा मुंजाळ, मिरा राख,जरिना नजीर,सुमन धोतरे,लता गुंजाळ, सविता चौगुले, विद्या नेमाने सह अनेक महिला उपस्थित होते.

स्वातंत्र्य पासून रस्त्यासारख्या सुविधेला मुकावे लागने हे मगासले पणाचे लक्षण आहे. पाटोदा नगरपंचायत चे मुख्यअधिकारी यांनी लक्ष द्यावे अन्यथा शिवसंग्राम आंदोलन छेडणार.- सुशील तांबे तालुका अध्यक्ष शिवसंग्राम पाटोदा व असिफ शेख शिवसंग्राम शहर अध्यक्ष पाटोदा