पाटोदा तालुकाबीड जिल्हा

बीड जिल्ह्यात खरे कामगार कामावर आणि बोगस कामगार योजनेवर – सय्यद सलीम

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कामगार या असंघटित कामगारांसाठी शासनाने यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना आणल्या आहे. परंतु हि योजना कामगारांना मिळत नसून बोगस कामगारानाच मिळत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पाटोदा नगरपंचायत येथे निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कामगार कार्यालयाच्या माध्यमातून शासनाने कामगारासाठी अनेक योजना राबविण्यात आले आहे. गेल्या लाॅकडाऊन मध्ये पाच हजार व सध्याच्या लाॅकडाऊनमध्ये दिड हजार रुपये कामगारांना शासनाकडून देण्यात आले आहे. परंतु यामध्ये अनेक खरे कामगारांना या आर्थिक योजनेचा लाभ कामगारांना मिळाला नसून .बोगस कामगारांना याचा लाभ मिळाला असल्याचे कामगारामध्ये बोलले जात असल्यामुळे . ग्रामपंचायत,नगरपंचायत,
नगरपालिका यांनी इमारत कामगारांची सखोल चौकशी करून नव्वद दिवसाचा कामाचे प्रमाणपत्र देण्यात यावे.यासाठी पाटोदा नगरपंचायत येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना चे संस्थापक अध्यक्ष प्रमिला ताई माळी यांच्या आदेशावरुन व प्रदेश अध्यक्ष समीर काजी मराठवाडा अध्यक्ष नवीद बाबा खान, व बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद फरहान यांच्या सूचनेवरून व तालुका अध्यक्ष सय्यद सलीम राज यांचे अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले आहे.यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगारसेनेचे ता.अध्यक्ष सय्यद सलीम, स्वराज्य वास्तुसेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष हमीदखान पठाण,सचीव पेंटर प्रशांत लोहार,आरेफ पठाण, महादेव शिंदे,शेख मोहशीन हमीद,सय्यद इम्रान,शादेक ताबोळी,शमशेर पठाण,फेरोज पठाण,पठाण जाहेद,सय्यद फयाजसह अनेक कामगार उपस्थित होते.

Back to top button