बीड (नानासाहेब डिडुळ,उपसंपादक): – शहरातील मुस्लिम बहुल भागात असलेल्या मुहम्मदिया कॉलनी आणि मोमीनपुरा येथील कच्च्या रस्त्यांवर बीड नगर परिषदेने कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुरूम टाकून तात्पुरती का होईना रस्त्यांवरील चिखलापासून नागरिकांची सुटका केली. परंतु मुरूम टाकताना नाल्यांकडे लक्ष ठेवले नसल्याने टाकलेला मुरूम रस्त्यांसह नाल्यांमध्ये ही भरपूर प्रमाणात पडला. यामुळे नाल्यात तुंबून नाल्यातील गलिच्छ पाणी रस्त्यांवर येणार असल्याने पुन्हा एकदा या दोन विभागात चिखलपुरा तयार होणार असल्याने येथे बीड नगर परिषद सिमेंट किंवा डांबरी रस्ते तयार तर करीत नाही. निदान टाकलेले मुरूम तरी चांगल्या पद्धतीने रस्त्यांवर टाकावे. ते नाल्यांमध्ये जाणार नाही याची दक्षता घेणे अपेक्षित असताना याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने या दोन्ही प्रभागातील ज्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आले त्या-त्या रस्त्यांवरील दोन्ही बाजूंच्या नाल्या मुरुमाने भरून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या घरातील नालीमध्ये येणारे सांडपाणी लवकरच रस्त्यांवर येऊन टाकलेले मुरूम पुन्हा चिखलाचे रूप घेईल आणि पुन्हा एकदा या दोन्ही भागाला चिखलपुराचे रूप येणार आहे. तरी कृपया या दोन्ही भागातील नाल्यांमध्ये पडलेला मुरूम लवकरात लवकर काढून रस्त्यांवर टाकण्यात यावा. नाल्यांमध्ये घाण पाणी तुंबून न राहता वाहते राहावे. याकडे बीड नगरपरिषदेने लक्ष द्यावे. तसेच रस्त्यावर टाकलेले मुरूम तसेच नाल्यांमध्ये पडलेले मुरूम सुद्धा रस्त्यांवर टाकल्यानंतर त्याला रोलर ने दाबण्यात यावे आणि येथील नागरिकांचे जगणे सुसह्य करावे. अशी मागणी एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या पत्रकातून केली असून जर येत्या आठ दिवसात वर नमूद केल्याप्रमाणे बीड नगर परिषदेने या दोन्ही भागात कार्य केले नाही तर आपण जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या मार्गदर्शनात बीड नगर परिषदे विरोधात आंदोलन करू. असा इशाराही दिला आहे.