स्वकर्तृत्वावर संपूर्ण जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणणाऱ्या डाॅ.प्रितमताई मुंडेंच्या मागे संपूर्ण बीड जिल्हा उभा राहील – ना.पंकजाताई मुंडे

माजलगांवात आयोजित केली होती बैठक अन् झाली सभा !

माजलगाव दि. २९: खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी गेल्या पांच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हयात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून स्वकर्तृत्वावर जिल्हयाला विकासाच्या महामार्गावर आणून ठेवले आहे, जिल्हा वासियांना याची जाणीव असल्याने या निवडणुकीत संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा ठाम विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.

युवा नेते नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की बैठकीचे रूपांतर छोटेखानी सभेतच झाले. याप्रसंगी आमदार आर टी देशमुख, माजी आमदार मोहन जगताप, नितीन नाईक नवरे, नगराध्यक्ष सहाल चाऊस, डॉ. प्रकाश आनंदगावकर, किसनराव नाईकनवरे, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर,बबनराव सोळंके, ज्ञानेश्वर मेंढके आदी उपस्थित होती.

बीड जिल्ह्याचा व्यापक विकास करणे हेच माझ्या राजकारणाचे प्रमुख सूत्र आहे मागील पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. शक्य त्या प्रकारे सर्वंकश विकास घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आगामी काळात राहिलेल्या विकासाच्या योजना पूर्ण करण्यासाठी खासदार प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाची गरज असून भारतीय जनता पक्षाच्या बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुखांनी ताकदीने निवडणूकीत उतरावे असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.

बीड जिल्हा विकासाच्या मागे

या निवडणुकीत विरोधकांकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही त्यामुळे ते काहीतरी कुभांड रचून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत याउलट खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया जिल्हयात केलेल्या विकासाच्या बळावर मैदानात उतरल्या आहेत, त्यामुळे हा जिल्हा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील असा ठाम विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या की, मागील पाच वर्षात केलेली विकासाची कामे व भविष्यकालीन विकासाचे कार्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचे सरकार येणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने मागील पाच वर्षात विकासाची प्रचंड कामे केली नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्व भारताने विकासाचा खूप मोठा पल्ला गाठला आहे अजूनही अनेक मोठी कामे करणे बाकी असल्याने केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार निवडून येणे गरजेचे आहे, त्यासाठी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यातून प्रीतम ताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष बूथ रचना व तिथला कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा आहे. आगामी १८ तारखेला बूथ कार्यकर्त्यांनी व शक्ती केंद्रप्रमुखांनी नियोजनबद्ध कार्य करून अधिकाधिक मतदान करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी सर्व नगरसेवक, सरपंच, उपसरपंच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.