बीड़:नानासाहेब ड़िड़ूळ― पाटोदा तालुक्यातील दासखेड़ येथील पञकार ड़ाॅ. हरिदास शेलार यांनी दिलेल्या एका बातमी मध्ये नावे प्रसिद्ध न केल्या बद्दल काही दिवसापुर्वी दासखेड़ गावातील काही राजकीय व्यक्तिंनी फोन वरून अश्शील भाषेत शिवीगाळ करून तसेच त्यांना गावातील चौकात नेऊन मारहाण करण्यात आली होती व त्यांच्या कड़ील मोबाईल फोन पळवला आहे.यामुळे पञकार ड़ाॅ. हरीदास शेलार व त्यांचे कुटुंबातील सदस्य दहशती खाली आहेत तरी शेलार यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे तसेच मारहाण करणार्या आरोपींना तात्काळ अटक करून कड़क कारवाई करावी अशी मागणी मराठी पञकार परीषदेच्या वतीने मंगळवार रोजी उपविभागीय कार्यालय चे अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पञकार सोमीनाथ कोल्हे,पोपट कोल्हे,दयानंद सोनवणे , नानासाहेब ड़िड़ूळ, हमिद पठाण, महेश बेदरे , कादर मकरानी, सोमीनाथ खंड़ागळे, अजय जोशी ,संजय सानप, श्रीराम लांड़गे, आमीर शेख,विजय जोशी ,अजीज शेख,जावेद शेख, महेशर शेख,हरीदास शेलार इ.पञकार हजर होते.