बीड दि.३१:बीड जिल्हयाच्या राजकारणात आमचे नाते मातीशी आणि माणसांशी आहे. विकास करताना मी जाती-पातीच्या आधारवर निधीचे वाटपही केले नाही. माणुस हिच माझी जात असून मला फक्त महिला व पुुरुष या दोनच जाती माहित आहेत. विरोधक माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करत असले तरी मी केवळ विकासासाठीच राजकारण करत असून निवडणुकीनंतर देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार त्यासाठी बीड जिल्हयातील सर्वसामान्य जनतेचा आशिर्वाद आम्हाला हवा आहे. माझी बहिण मी तुमच्या वटित टाकते तिला आशिर्वाद द्या असे म्हणत राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी देवडी ता.माजलगांव येथे आयोजित केलेली सभा जिंकली. दरम्यान माझ्या बहिणीने वडीलांचे नांव लावले तर तुमचे काय बिघडले हे सांगताना त्या म्हणाल्या की, आम्हाला बाबापासून दुर का करता ? हा सवाल त्यांनी विचारला.
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-रिपाई-रासपा- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारात देवडी ता.माजलगांव येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. प्रचंड जनसमुदयासमोर बोलताना मंत्री पंकजाताई म्हणाल्या की, मला आशिर्वाद देण्यासाठी महिला एवढया संख्येने येतात हे पाहून माझा उत्साह वाढतो. पाच वर्षात जिल्हयात काम करतांना विकासाच्या प्रश्नाशिवाय मी सुतभर बाजुला गेली नाही आणि विकासनिधी देताना मी जातीपातीचे राजकारण न करता माझी माणसं माझा जिल्हा हे सुत्र डोळयासमोर ठेवले. ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या कल्याणासाठी रस्त्यांची कामे केली, राष्ट्रीय महामार्ग मंजुर केले, मुलभुत गरजांना प्राधन्य देतांना प्रितमताईंनी बीड नगर परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावून दाखवला. गाव तेथे कोटीच्या घरात योजना मी आणल्या आहेत. आम्ही भगिंनीनी अगोदर काम करून दाखवले मग पुन्हा मतदान मागतो. विरोकांना आमच्या विरोधात बोलण्यासाठी विकासाच्या प्रश्नावर मुद्दाच नाही ? परिणामी जातीपातीचा आधार घेवून निवडणुक वेगळया वळणावर घेवून जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पाच वर्षात काम करतांना गुंडगिरी, दादागिरी हे शब्दही कधी मला शिवले नाहीत. माझी भुमिका, माझे काम, लोकांनी पाहिलेले आहे. यावरही बोलातान त्या म्हणाल्या की, बीड जिल्हयात जातीपात कधीच झाला नाही ज्या जिल्हयाने स्व.क्रंातीसिंह नाना पाटील, स्व.गंगाधर आप्पा बुरांडे, स्व.केशरकाकू क्षीरसागर, स्व.गोपीनाथरावजी मुंडे अशी माणसे खासदार म्हणून निवडून दिेले. त्यामुळे जिल्हयाच्या राजकीय संस्कृतीला जातीपातीचा रंग कधीच नाही. या निवडणुकीसाठी प्रितमताईंच्या रुपाने उच्चविद्याभुषित उमेदवार आपल्या डोळयासमोरा आहे त्यांनी केलेले काम आपण सर्वानी पाहिलेले आहे. पात्र कोण अपात्र कोण हे आपण ठरवा. मी माझी बहिन आपल्या ओटित टाकत असून तिला सुजान मतदारांनी आशिर्वाद दयावेत असे आवाहन त्यांनी केले.
‘‘बाळा जिवाला संभाळ’’…मला बाबाच दिसले
देवडीत कार्यक्रमाच्या स्टेजवर ना.पंकजाताई यांचे आगमन झाले तेव्हा ८९ वर्षाचा एक वृध्द स्टेजवर आला आणि मंत्री महोदयाच्या डोक्यावर हात ठेवताना ते म्हणाले बाळ जिवाला संभाळ हा प्रसंग पाहून सद्गतीत झालेल्या पंकजाताईंना जाहिरपणे बोलताना सांगितले की, मला वृध्द आजोबांच्या रुपात बाबाच दिसले. कारण मी सभेला बाहेर पडतानाही गोपीनाथगडावर जावून बाबांच्या समाधीला नतमस्तक होते. त्याच क्षणी जणूकाही मला मार्गदर्शनपर धडेच मिळाले असा भास होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत ना.महादेव जाानकर, आ.आर.टी.देशमुख, केशवदादा आंधळे, मोहन जगताप, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे आदिंची भाषणे झाली. तर व्यासपीठावर रासपा नेते बाळासाहेब दौडतले, सभापती दिनकर आंधळे, तालुकाध्यक्ष राम पाटील, नितीन नाईकनवरे, अरुण राऊत, श्री उजगरे, बाबरी मुंडे, संजय आंधळे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रस्ताविक मच्छिद्र झाटे यांनी केले. सुत्रसचंलन सुग्रीव मुंडे यांनी केले. या सभेला दहा हजार जनसमुदायाची उपस्थिती होती.