माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘ई पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम आता दर गुरुवारी महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजना,निर्णय व उपक्रमांची माहिती दिली जाते. संबंधित विभागाचे सचिव तसेच अन्य शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या विविध विषयांवरील मुलाखती या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येतात.

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात गुरूवार दि. 4 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता उपजिल्हाधिकारी तथा ‘ई – पीक पाहणी’ चे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची ‘ ई पीक पाहणी ‘ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे.निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

 

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR