सोयगाव दि.३०(ज्ञानेश्वर पाटील):जरंडी ता.सोयगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी घेण्यात आठवडे बाजारासाठी लिलाव करण्यात आला.ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या लिलावाच्या बैठकीत आठवडे बाजाराचा लिलाव चक्क निम्म्या लाखावर करण्यात आला.
जरंडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या आठवडे बाजाराचा मार्च अखेरीसनंतर पुढील आर्थिक वर्षासाठी लिलाव करण्यात आला सागर राठोड या तरुणाने बोलीद्वारे पन्नास हजारावर हा लिलाव घेतला आहे,यावेळी सरपंच समाधान तायडे,उपसरपंच सुनील पवार,ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील,शेख पाशा,मधुकर पाटील,आदींच्या उपस्थित लिलाव पद्धत करण्यात आली,यावेळी विठ्ठल गोरे,अरुण लोहार,धृपताबाई सोनवणे,बाबू पटेल,शेख रशीद आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.