सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे ऐन नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या तंबूत जाणार असल्याची माहिती बुधवारी विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे ऐन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर सोयगावातील हा मोठा राजकीय फेरबदल घडणार असून गुरुवारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
मागील पंचवार्षिक नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा कडून इच्छुक असलेले राजू दुतोंडे हे भाजपाकडून संधी न मिळाल्याने त्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर पुन्हा राजकीय प्रवासात सक्रीय होवून त्यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली काम सुरु केले होते पक्षाने त्यांच्या खांद्यावर युवकांचे संघटन करण्याचे जबाबदारी दिल्यावर त्यांनी शहरातील विविध समस्यांवर वाचा फोडून आंदोलने उभारली होती.मात्र पक्ष नेतृत्वावरील नाराजीमुळे त्यांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर आहे.गुरुवारी त्यांचा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असाल;याहे संकेत सूत्रांनी दिली आहे.
सोयगावात मोठा फेरबदल―
राजकीय दृष्टीने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे यांचा शिवसेना प्रवेश महात्वाः मानला जात असून या प्रवेशामुळे सोयगावात पहिला मोठा राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.