निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा; निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचे निर्देश

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अकोलादि.27(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक 2021 करीता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यानी अधिक दक्ष राहून निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करा. निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा, असे निर्देश निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले.

अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूकीच्या अनुषंगाने आज पहिली कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, झोनल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचे निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मार्गदर्शन करताना सूचना दिल्या की, विधान परिषद निवडणूक छोट्या स्वरुपाची जरी असली तरी निवडणूकीकरीता अधिक दक्ष व काळजीपूर्वक काम करावे लागेल. निवडणूकीला प्रत्येक मताला महत्व असून एका मताच्या फरकाने उमेदवारांचे भविष्य निश्चित होवू शकते. याकारणास्तव कुणीही निवडणूकीला गाफील न राहता व मनात शंका न बाळगता कार्यशाळेत शंकाचे निराकरण करुन घ्या. तसेच निवडणूकीकरीता देण्यात येणारे साहित्य तपासून साहित्य हाताळणीचे उजळणी करुन घ्यावी, असेही निर्देश यावेळी दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शन करताना आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या प्रक्रियेबाबतची माहिती दिली. निवडणूकीकरीता मतदान केंद्राध्यक्ष व  अधिकारी यांची सेवा निवडणूक आयोगाने प्रतिनियुक्तीने केली असल्याने त्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने तंतोतंत कार्यवाही करणे अनिवार्य आहे. या कार्यशाळेत कुणतेही शंका व अडचणी मनात न ठेवता निवडणूक प्रक्रियेकरीता सज्ज रहा. कार्यशाळेत मतपेटी व साहित्य हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

0000000