प्रशासकीयब्रेकिंग न्युज

राजधानीत संत जगनाडे महाराज जयंती साजरी

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, 08 :  संत  जगनाडे  महाराज यांची  जयंती  आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.  कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त शामलाल गोयल यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे ,  सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी  संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर  यांच्यासह  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

     ‍                                                          000

Back to top button