प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१; मतदानास शांततेत प्रारंभ

आठवडा विशेष टीम―

अकोलादि.10(जिमाका)- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ  निवडणूक 2021 ची मतदानास सकाळी आठ वाजेपासून शांततेत प्रारंभ झाला. निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज मतदान केंद्रावर भेट देवून पाहणी केली.

आज सकाळी डॉ. पांढरपट्टे यांनी अकोला तहसिलअंतर्गत असलेल्या बी. आर. हायस्कूल येथील मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावरील सोईसुविधा, सुरक्षा व मतदान प्रक्रियेची माहिती मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडून जाणून घेतल्या.

००००००

Back to top button