प्रशासकीयब्रेकिंग न्युज

संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि. 6- आपले स्वरमाधुर्य आणि गानप्रतिभेने संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन अत्यंत वेदनानदायी आहे. भारतीय संगीताचा भावस्पर्शी स्वर आज हरपला आहे.अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

लतादीदींच्या तजेलदार, भावमयी आवाजाच्या आनंदघनामध्ये रसिकांच्या पिढ्यानपिढ्या सुरात न्हाऊन निघाल्या आणि यापुढेही हा सूर भारतीय संगीतात अढळ राहील. गानसरस्वती लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

Back to top button