प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत; पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 6 : कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेत  कित्येक कुटुंबीयांनी आपल्या घरातील कर्त्या पुरूषाला गमावले. काही मुले आई अथवा वडिलांच्या छत्राला पोरकी झाली. या वंचित कुटुंबियांना आर्थिक आधार देण्यासाठी सह्याद्री फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

कोविडमुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या वंचित कुटुंबातील विधवा महिला व मुलांना सह्याद्री फाउंडेशनच्यावतीने प्रत्येकी 30 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला याप्रसंगी उपस्थित होत्या. यावेळी 62 व्यक्तींच्या अवलंबितांना प्रत्येकी 30 हजार याप्रमाणे एकूण 18 लक्ष 60 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

डॉ. राऊत म्हणाले, कोविडमुळे आधार गमावलेल्या कुटुंबियांना महाविकास आघाडी सरकारतर्फे 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढे येण्याची गरज आहे. सह्याद्री फाउंडेशन या संस्थेने याकामी पुढाकार घेऊन उत्तर नागपुरातील वंचित कुटुंबियांना प्रत्येकी 30 हजारांची मदत केली, ही निश्चितच कौतुकाची आणि इतरांना प्रेरणा देणारी बाब आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री फाउंडेशनचे विजय क्षीरसागर, रत्नाकर जयपूरकर,दिपक खोब्रागडे,सुरेश पाटील, मूलचंद मेहर, सचिन डोहाने, प्रकाश नांदगावे,ओंकार अंजीकर,  जितेंद्र वेडेकर, इंद्रपाल वाघमारे, विजयालक्ष्मी हजारे, कल्पना द्रोणकर, गीता श्रीवास, अस्मिता पाटील, रेखा लांजेवार, गौतम अंबादे, तूषार नंदागवळी, बालमुकुंद जनबंधू, सचिन कोटांगळे, प्रविण बागडे, उत्तरेश वासनिक, प्रामिक वंजारी, निलेश खोब्रागडे आदींनी परिश्रम घेतले.

Back to top button