आठवडा विशेष टीम―
नागपूर,दि. 25 : रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोणी नागरिक असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी नमूद क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0712-2562668 ई-मेल- [email protected] |
केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री) फोन – 011-23012113/23014105/23017905 Fax no.-011-23088124, Email ID:[email protected] |
नागपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. विमला यांनी केले आहे.
आतापर्यत नागपूर जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. ही मुले युक्रेनमध्ये आहेत. या मुलांची नावे व अन्य संपर्क माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षामार्फत केंद्र शासनाला कळविण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा प्रशासनाकडे युक्रेन येथील युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकून असलेल्या पुढील विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती केंद्र शासनाला देण्यात आली आहे हे सर्व विद्यार्थी असून यामध्ये पियुष मिलिंद गोमासे, तनुजा धर्मराज खंडाळे, सेजल मिलिंद सोनटक्के, हिमांशु मोतीराम पवार, रवीना प्रभाकर थाकीत या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
*****