प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सारसी येथे विविध सुविधांचे भूमिपूजन; ग्रामीण भागात दर्जेदार सुविधांच्या उभारणीला वेग

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. १ : ग्रामीण भागात रस्ते, आवश्यक इमारती, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी महाविकास आघाडी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, दर्जेदार सुविधांची निर्मिती होत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

तिवसा तालुक्यातील सारसी येथे जलजीवन मिशनमध्ये ३६ लक्ष ५० हजार रुपये निधीतून नळ पाणी पुरवठा विहीर योजना, १० लक्ष निधीतून गायत्री मंदिर सोयी सुविधा व सौंदर्यीकरण, पार्वतीमाता मंदिर परिसरात १० लक्ष निधीतून सभामंडप आदी कामांचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भैयासाहेब वऱ्हाडे, अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात ठिकठिकाणी अनेक रस्ते, इमारती, पाणीपुरवठा योजना आदी कामे पूर्णत्वास जात आहेत. कामांची आवश्यकता ओळखून शासनाकडून वेळोवेळी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रशासनानेही गुणवत्ता राखून विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Back to top button