प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी साधला संवाद

आठवडा विशेष टीम―

मालेगाव, दि. 13 (उमाका वृत्तसेवा) :शासनाच्या योजनांची गाव पातळीवर नियमित अंमलबजावणी होण्याकरिता शासन आपल्या दारी अंतर्गत राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील विविध गावांत भेटी दिल्या.

आज मालेगाव तालुक्यात कृषिमंत्री श्री. भुसे यांचे गावनिहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे जिल्हा परिषद सदस्य श्री. शेजवळ, प्रमोद पाटील, राभाऊ मिस्तरी मनोहर बच्छाव, अशोक भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकायरी अभियंता अरविंद महाजन, कार्यकारी अभियंता श्रीमती वाघमारे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, विद्युत विभागाचे श्री. भामरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळती होण्याच्या दृष्टीने वीज पुरवठा अधिकारी यांनी व्यवस्थती नियोजन करुन डीपी दुरुस्ती करणे, डीपीची क्षमता वाढविणे, नवीन डीपी व कनेक्शन पुरवठा करणे, मागणीप्रमाणे सोलर पंपा बाबत ऑनलाईन अर्ज भरुन घेणे, विद्युत तारांचे झोळ काढणे, रस्ता दुतर्फा दिवे चालू ठेवणे व दुरुस्ती करणे, वायरिंग बदलणे आदिबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन वीज कंपनी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक गावात कृषी कार्यालयाने महाडीबीटी मार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधुन कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मागरदर्शन करावे अशा सूचनाही यावेळी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी संबधित विभागाना दिल्या आहेत.

संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांचे हयातीचे दाखले प्राप्त करुन तहसिलदार यांना सादर करावेत. एकही लाभार्थीं वंचित राहणार नाही याची दक्षत घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी कृषी विभागाने उपस्थितांना महाडीबीटी योजना, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, कांदा चाळ, फळबाग लागवड , शेतीसाठी लागणारे औजारे आदी योजनांची माहिती दिली. तसेच वीज विभागाने वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी व जळीत डीपी, नवीन डीपी टाकणे आदि कामांना प्राधान्यक्रम देण्यात येईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. महसूल विभागाने आपल्या योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.

आज कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री श्री. भुसे यांनी तालुक्यातील गाळणे, नागझरी, डोंगराळे, भारदेनगर, घाणेगाव, कौळाणे गा., अस्ताणे, टोकडे, हाताणे या गावामध्ये जाऊन तेथील जनतेशी संवाद साधून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहनही यावेळी केले आहे.

Back to top button