आदिवासी सोयगाव तालुक्याचा कोट्यावधी निधी परत

मार्च अखेरीसचा सोयगावच्या विकासाला दणका

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव दि.०३:जिल्ह्यात विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या सोयगाव तालुक्याचा विविध यंत्रणांचा कामेच न झाल्याने अखर्चित निधी संबंधित विभागांना परत गेल्याचे बुधवारी मार्च अखेरीसच्या ताळेबंद नंतर उघड झाल्याने कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्याचा कोट्यवधी रु चा निधी मार्च अखेरीसला अखर्चित म्हणून परत गेला आहे.यामध्ये वनविभाग,सामाजिक वनीकरण,कृषी विभाग,आरोग्य विभाग,भूजल सर्वेक्षण,लघु सिंचन(जिल्हा परिषद)पाटबंधारे आदि विभागांचा प्रामुख्याने समावेश आहे.दरम्यान शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचाही निधी खर्च न झाल्याने शासनाच्या खात्यावर वळविण्यात आला आहे.
आदिवासी आणि अति दुर्गम तालुका म्हणून सोयगावचा ठसा राज्यभर उमटलेला आहे.स्वतंत्र विधानसभा मतदार संघ नसलेल्या सोयगाव तालुक्याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले असतांना अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे तालुक्याचं विकास आराखड्यात सन २०१७-१८ या वर्षातील कोट्यवधी निधी शासनाला पुन्हा परत गेल्याने विकासापासून दूर असलेल्या सोयगाव पुन्हा विकासापासून वंचित राहिला आहे.दरम्यान तालुकास्तरावरील अधिकारी सोयगावला सतत गैरहजर राहणे,प्रभारी अधिकारी,आदि प्रमुख कारणे विकासासाठी असली तरीही प्रभारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांवर निधी खर्च न केल्यान मार्च अखेरीसचं ताळेबंदमध्ये शिल्लक राहिलेला निधी शासन खात्यावर वळविण्यात आला आहे.सोयगाव पंचायत समितीचा निधी परत जाण्यामागे मोठा सहभाग दिसून आल्याने ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या सोयगाव पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे आणि प्रभारी गटविकास अधिकारी ही दोन प्रमुख कारणे मानली जातात,दरम्यान सोयगाव महसूल विभाग शासनाच्या निधी खर्च करण्यावर अव्वल ठरला असून शेतकऱ्यांच्या सर्वच योजनांचा निधी महसूल विभागाने तातडीने वर्ग केल्याने निधी परत जाण्यात महसूल विभाग निरंक राहिला आहे.

जलयुक्त योजनेची कामेच न झाल्याने तालुका कोरडा

जलयुक्त शिवार योजनेची सन २०१७-१८ मधील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देवूनही संबंधित यंत्रणांनी कामे हाती न घेतल्याने या योजनेचा लाखो रुचा निधी परत गेला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात शाश्वत पाणीसाठा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना अपयश आले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.