प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २०१९’ चा निकाल जाहीर

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा -२०१९ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे, तर सहायक मोटार वाहन निरीक्षक – २०२० परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध  करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या संवर्गातील ३५ पदांकरीता मुख्य परीक्षा- २०१९  घेण्यात आली होती, या परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. त्याशिवाय आयोगामार्फत नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी  प्रसिद्ध करण्यात आली असून ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

००००

Back to top button