प्रशासकीय

आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डी.लिट पदवी प्रदान

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 25 : आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 25) राजभवन मुंबई येथे  एका विशेष दीक्षांत समारंभात मानद डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे प्रा. जगदीश मुखी यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली.

जगदीश मुखी यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ देशाला मिळावा अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने राजस्थानच्या ग्रामीण भागात महिला शिक्षणासाठी चांगले काम केल्याबद्दल मुखी यांनी संस्थेचा गौरव केला.

यावेळी श्री जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विनोद टिब्रेवाला व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठाचे व्यवस्थापन करणाऱ्या राजस्थान सेवा संस्थेच्या शिक्षण संचालिका वनश्री वालेचा यांनी श्री.मुखी यांच्या मानपत्राचे वाचन केले.

जगदीश मुखी यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री पद भुषविले होते. त्यांना तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘देशातील सर्वोत्तम वित्त मंत्री’ हा पुरस्कार देण्यात आला होता.  सन 1980 पासून जगदीश मुखी यांनी दिल्लीतील जनकपुरी येथून सलग सात वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. आसामचे राज्यपाल होण्यापूर्वी ते अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल होते.

000

Governor Koshyari confers Honorary D.Litt. on Assam Governor Jagdish Mukhi

Mumbai Dated 25 : Assam Governor Prof. Jagdish Mukhi was presented the Honorary Doctor of Letters (D.Litt.) at a Special Convocation Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Friday (25 th Mar).

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Honorary D.Litt. to Prof Mukhi in recognition of his contribution to public life.

The Honorary D.Litt. was presented to Prof Mukhi on behalf of the Shri Jagdishprasad Jhabarmal Tibrewala (JJT) University headquartered at Jhunujhunu in Rajasthan.

Speaking on the occasion, Governor Koshyari hailed Prof Jagdish Mukhi for his long years of services to the nation. Prof Jagdish Mukhi praised the JJT University for its work towards women empowerment.

Chairperson of the Shri JJT University Dr Vinod Tibrewala was present on the occasion, while Education Director Dr Vanashri Valecha read out the citation.

Prof Jagdish Mukhi was a member of the Delhi Legislative Assembly for seven consecutive terms from Janakpuri. He served as a Minister in the Government of Delhi. He was awarded the ‘Best Finance Minister in the country’ award at the hands of then Union Minister Pranab Mukherji. Prof Mukhi served as Lt Governor of Andaman and Nikobar before his appointment as Governor of Assam.

0000

Back to top button