प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नाशिक द्राक्ष महोत्सवास कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी साधला संवाद

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दिनांक 26 (जिमाका वृत्तसेवा):  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नाशिक यांच्या वतीने ग्रेप पार्क रिसोर्ट येथे 26 व 27 मार्च  रोजी नाशिक द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आ‍ज राज्याचे कृषी व  माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी या द्राक्ष महोत्सवास भेट दिली. यावेळी द्राक्षांच्या विविध वाणांची पाहणी करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी कृषिमंत्री यांनी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, कृषी अधिकारी रितेश लिळवे, डॉ. राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.

द्राक्षांच्या विविध उत्कृष्ट वाणांचे उत्पादन करणाऱ्या 35 शेतकरी व उत्पादकांना पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी नानासाहेब पर्पल या द्राक्ष वाणासाठी रमेश राजाराम भालेराव, थॉमसन सिडलेस या द्राक्ष वाणासाठी वसंत चंद्रभान टिकले तर प्लेन या द्राक्ष वाणासाठी हेमंत मोहनलाल ब्रम्हेचा यांचा प्रातिनिधिक स्वरूपात कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

Back to top button