प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 29 मार्चबुधवार दि. 30 मार्च 2022 आणि गुरूवार 31 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

सायबर गुन्हेत्याचे प्रकार आणि त्याविषयी विभागाची भूमिका, याबरोबर लोकांनी इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची काळजी, लहान मुलांच्या हातात मोबाईल फोन देताना घ्यावयाची काळजी आदी विषयांची सविस्तर माहिती यशस्वी यादव यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

000

Back to top button