आठवडा विशेष टीम―
नाशिक दि. 29 मार्च 2022 (आठवडा विशेष वृत्तसेवा) :- निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे लासलगाव वाकी रस्ता किमी 0/000 ते 2/ 200 ची सुधारणा करणे कामाचे आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पिंपळगाव नजीकचे सरपंच काशिनाथ माळी, डॉ.श्रीकांत आवारे, उपसरपंच अफजल शेख, नगरसेविका समिना मेमन, वेदिका होळकर, गुणवंत होळकर, रऊफ पटेल, संतोष ब्रम्हेचा, मंगेश गवळी, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग निफाडचे उपविभागीय अभियंता अर्जून गोसावी, शाखा अभियंता गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
000