प्रशासकीय

लांजा नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

आठवडा विशेष टीम―

रत्नागिरी दि. २९ (जिमाका)-:  रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या  उद्घाटन प्रसंगी  राज्याचे परिवहन संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत लांजा यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या  प्रदर्शनाची पाहणी करून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी जुने टायर व इतर टाकाऊ पदार्थापासून तयार केलेल्या कुंड्यांची पाहणी ही त्यांनी केली. हे उद्यान  लांजा मधील रहिवाशांसाठी विरंगुळ्याचे केंद्र बनेल.

०००

Back to top button