प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बाल मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.स्म‍िता पाटील यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रूग्णालयातील बाल मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. स्म‍िता पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 1 एप्रिल व शनिवार 2 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदिक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

2 एप्रिल हा जागतिक स्वमग्नता जागृती दिन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या औचित्याने बालकांमधील स्वमग्नता, त्याची लक्षणे आणि पालकांनी घ्यावयाची काळजी या विषयांची सविस्तर माहिती डॉ.स्म‍िता पाटील यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून  दिली आहे.

00000

Back to top button