बंजारा समाज भाजपाच्या पाठिशी उभा-भारतीय बंजारा क्रांती दलाचे शरद राठोड यांची माहिती

समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल बंजारा शिष्टमंडळाने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

अंबाजोगाई (प्रतिनिधी): गेल्या साठ वर्षात काँग्रेस पक्षाने बंजारा समाजाला विकासाच्या बाबतीत वंचित ठेवल्याबद्दल बंजारा समाज आजही काँग्रेसवर नाराजच आहे.गेल्या पाच वर्षांत बंजारा समाजासाठी भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालय स्थापन केले. समाजाला घरकुले देण्यात आली. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देण्यात आला. तांडा सुधार योजने अंतर्गत 10 कोटी मंजूर करण्यात आले. बीड जिल्ह्यात अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या मागणीनुसार एक कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनाच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याला रस्ता करण्यात आला. तसेच 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती शासनाने साजरी करण्याचे जाहीर केले. तसा आदेश काढला. पोहरा देवी देवस्थान विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 कोटी रूपये देण्याबाबत सांगितले. या सर्व बाबींमुळे बंजारा समाज भाजपावर खुष असून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला असल्याची माहिती भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रिय महासचिव शरदभाऊ राठोड यांनी 39-बीड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत व कॉर्नर बैठकीत दिली.

भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,
जलसंपदा मंञी ना. गिरीष महाजन,मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांची, मागण्यांची सोडवणूक केल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार जाहीर मानले व लोकसभा तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय बंजारा क्रांती दल ही संघटना भाजपाच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. राज्यातील सर्व मतदार संघात बंजारा क्रांतीदलाचे कार्यकर्ते भाजपाच्या विजयासाठी काम करत असल्याचे सांगितले व पाठिंब्याचे जाहीर पत्र त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले.गतवर्षी 20 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड यांच्यासह बंजारा समाजाचे विविध प्रश्न व मागण्या सरकार दरबारी ठेवल्या.त्यातील बऱ्याच मागण्या शासनाने मंजूर करून बंजारा समाजाला विकासाच्या बाबतीत झुकते माप दिले.त्यामुळे बंजारा समाज हा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून भाजपाच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला असल्याचे दिसून येत आहे. भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय महासचिव शरदभाऊ राठोड यांनी बीड जिल्हा पिंजून काढला असून ते डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी आहोरात्र प्रचार करीत आहेत.सोमवार,दि.8 एप्रिल रोजी शरदभाऊ राठोड यांनी बीड जिल्हातील गेवराई तालुक्यातील प्रत्येक तांड्यावर जावून बंजारा समाजातील मतदारांच्या गाठी-भेटी घेवून जोरदार प्रचार केला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.