आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.७ : राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राज्यात2500मेगावॅटक्षमतेपर्यंतचेअल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्कविकसितकरण्याकरीतानॅशनलथर्मलपॉवरकॉर्पोरेशनलिमिटेड(किंवात्यांचेसहाय्यक/सहयोगी कंपनी)वमहाराष्ट्रराज्यविद्युतनिर्मितीकंपनी(महानिर्मिती)यांच्यादरम्यानअनुक्रमे50:50याप्रमाणातभांडवलीगुंतवणूकराहील.
ही संयुक्त उद्यम कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्यशासनाच्याऊर्जाविभागासराज्यसुकाणूअभिकरण(State Nodal Agency)म्हणूनघोषितकरण्यातआले.
या समितीवर राज्यशासनाच्याअपारंपरिकऊर्जाधोरणाशीसुसंगतअशाबाबींचेपालनकरण्याचीजबाबदारीटाकण्यातआलीआहे.सौरऊर्जापार्कमधीलप्रकल्पधारकाकडूनएक रकमी शुल्क ववार्षिकसंचलनवदेखभालशुल्कइ.केंद्रशासनाच्यामार्गदर्शकसूचनांनुसारअनुज्ञेयकरण्यात आले आहे
अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.