प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनु गोयल यांच्याकडून कोरेगाव तालुक्यातील कामांची पाहणी

आठवडा विशेष टीम―

सातारा  दि. 7: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राज्याचे आयुक्त शंतनु गोयल यांनी नुकताच सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जांब खु., एकसळ व तडवळे या गावांतील कामांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जांब खु. या गावातील फळबाग, शेततळी,   वैयक्तिक सिंचन विहिर,   एकसळ गावामधील प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतींचे काम, तडवळे येथील प्राथमिक शाळेमधील सरंक्षक भिंतीचे काम व पेव्हर ब्लॉकचे काम इत्यादी कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. यानंतर या गावामधील  ग्रामस्थांशी संवाद साधून योजने बाबतचे मार्गदर्शन केले.

आयुक्त शंतनु गोयल यांनी सर्वप्रथम मागणी वर्षाचे लेबर बजेट व अपूर्ण कामे पूर्ण करणे , सन २०२२-२३ चे लेबर बजेटमधील प्रस्तावित कामांची माहिती घेतली . तसेच दशवार्षिक आराखडा याचे नियोजन करणेकामी गावातील सर्व ग्रामस्थांना व यंत्रणांना फळबाग, वृक्षलागवड, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड,  माती नाला बांध, रस्ते, पाणंद रस्ते ही कामे मोठ्या प्रमाणात घेण्याबाबत सूचनाही केल्या.

Back to top button