आमदार डॉ. किरण लहामटे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, 7 : अकोले विधानसभा  मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी  आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ. का.)अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ. लहामटे  यांचे स्वागत केले. तसेच, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘महामुंबईचा महाविकास’ पुस्तिका त्यांना भेट स्वरुपात दिली. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी  साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयाहून देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. डॉ. लहामटे यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.