महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 11 : महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता सह्याद्री शासकीय अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे  होणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, माविमच्या व्‍यवस्‍थापकीय संचालक, श्रीमती श्रद्धा जोशी या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिला सुरक्षा ऑडीट प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण होणार आहे, त्याचप्रमाणे पहिल्या सत्रात महिला सुरक्षा ऑडिट प्रशिक्षण व दुसऱ्या सत्रात राज्यातील यशस्वी महिला उद्योजक/ सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यक्रम व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

—–