प्रशासकीय

‘जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमात डॉ. प्रदीप आगलावे यांची उद्या मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 13. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकविचारवंत आणि डॉ. आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवारदि. १४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी 12.00 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

 

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या एकात्मिक अभ्युदयासाठी आयुष्य वेचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयीभारताच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाविषयी  याविषयीची सविस्तर माहिती डॉ.  प्रदीप आगलावे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.

Back to top button