प्रशासकीयब्रेकिंग न्युज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, विधानपरिषदेच्या उपसभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Back to top button