माणूस म्हणून प्रत्येकाला न्याय दिल्यास ‘महाज्योती’चे ध्येय निश्चितच साध्य होणार

आठवडा विशेष टीम―

नाशिक दि. 16 एप्रिल 2022 (जिमाका वृत्तसेवा):   च्या उपक्रमांचे ध्येय निश्चितच साध्य होणार, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले  व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालय नाशिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाट्यप्रयोग प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे (भा.प्र.से),महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे, समाज कल्याण विभाग नाशिक उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार, यांच्यासह महाज्योतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. महात्मा फुले यांनी म्हटले आहे की, ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी  समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने केला पाहिजे. महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरा या विरूद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला आहे. असे विचार पालकमंत्री छगन  भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती तर ती अन्यायाविरूद्ध होती. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सुद्धा सेनापती म्हणून समाजातील सर्वच जातीधर्माचे लोक होते. व त्यांचा लढा हा सुद्धा अन्यायाविरूद्धच होता. या सर्वच महापुरूषांचे कार्य आजही आपल्याला पथदर्शी आहे. महाज्योती च्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल यात शंका नाही असे बोलून ,पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाज्योती च्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या  शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रसिकांसोबत उपस्थित राहून तृतीयरत्न या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

0000000000