पालघर दि.१०: पालघर लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३२ अर्जांची आज छाननी करण्यात येऊन त्यापैकी ३१ अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
सचिन दामोदर शिंगडा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपा सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावरील आक्षेप फेटाळला
पालघर लोकसभेतील भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले नसल्याचे कारण देऊन अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी बुधवारी छाननी दरम्यान आक्षेप नोंदवला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला.
दरम्यान या आक्षेपाबाबतचा निर्णय बुधवारी उशिरा जाहीर करण्यात आला.