आठवडा विशेष टीम―
नवी मुंबई दि. 18:- कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या चार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी संप सोडून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक एस.टी. वाहतूक सुरु झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एस.टी. महामंडळाने दिली.
२८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एस.टी. सेवा ठप्प झाली होती. दि. 8 एप्रिल 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 644, रत्निागरी जिल्ह्यातील आगारांत 1 हजार 125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संपसोडून कमावर हजर झाले आहेत.
कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.