आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 19 : आझादी का अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राचा हीरक महोत्सव यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. हे आयोजन करीत असताना निश्चित कार्यक्रम ठरवून या कार्यक्रमांची रुपरेषा तयार करण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मंत्रालयात सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, उपसचिव विलास थोरात आदी अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्य नाट्य स्पर्धा, चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजनाबरोबरच ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्राचा हिरक’ महोत्सवानिमित्त कोणते कार्यक्रम आणि ते राज्यभरात कोठे आयोजित करण्यात येणार आहेत, त्याचे स्वरुप नेमके कसे असेल याबाबतची रुपरेषा विस्तृतपणे सादर करण्यात यावी. जेणेकरुन या कार्यक्रमांचे आयोजन मुंबईसह विभाग आणि जिल्हास्तरावर करण्यात येऊ शकेल.

000