आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 22 :- पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या निवारणासाठी प्रधान महालेखापाल (ले. व ह.) – 1, महाराष्ट्र, मुंबई व पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्यावतीने ‘पेन्शन अदालत’ आयोजित केली आहे.
सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांनी पोलीस संकुल हॉल, नायगांव, दादर, मुंबई, येथे दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वा. उपस्थित रहावे, असे पोलीस उपआयुक्त (मुख्यालय-१), (अतिरिक्त कार्यभार) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००