शहीद जवानांच्या नावावर मत मागतांना भाजपला लाज कशी वाटत नाही―धनंजय मुंडे

राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर,मंठा येथे झंझावती सभा

जिंतूर/मंठा दि.१२: भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते हे आज जेथे जाईल तेथे शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. देशातील जवान शहीद झाले असताना त्यांच्या बलिदानावर मतदान मागतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा खणखणीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी मुंडे यांनी आज जिंतूर व मंठा तालुक्यातील विरेगाव येथे जाहीर सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.

जवानांच्या कर्तृत्वाचे, बलिदानाचे राजकीय भांडवल करणारा पंतप्रधान याआधी आपण कधी पाहिला नाही. तुमच्या 56 इंच छाती दम असेल तर या नवमतदारांना आम्ही तुम्हाला रोजगार देतो असा शब्द देऊन मत मागा, ते शक्य नाही म्हणून शहीद जवानांच्या बलिदानाचा असा वापर करू नका असे त्यांनी मोदी यांना सुनावले.

नरेंद्र मोदी यांनी आजच्या नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात राष्ट्रवाद आहे. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला नावे ठेवण्यापेक्षा भाजपाची मोदी पार्टी झाली आहे त्याचे काय ते बघा असा टोला लगावला.

परभणीच्या शिवसेनेच्या खासदाराच्या कृपेने आज किती गुंडाराज माजला आहे इथला खासदार वाळू माफिया आहे, जमीन माफिया आहे यांना खासदार नाहीतर नासदार म्हणणे योग्य होईल .

आज परभणी मध्ये फक्त राजेश विटेकर यांचे वादळ आले आहे हे वादळ मोदींची नसलेली लाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार साहेबांनी राजेश विटेकर सारख्या तरुण तडफदार युवकाला उमेदवारी दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त उमेदवार राष्ट्रवादीने तरुण दिले आहेत या नव्या विचारांच्या उमेदवारांना लोकसभेत आवाज म्हणून पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार माजिद मेमन , माजी मंत्री सुरेश वरपुडकर , माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे , आमदार रामराव वडकुते, आमदार विजय भांबळे यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.