भौगोलिक मानांकन व पेटंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 26 : आजच्या युगात एखाद्या वस्तूला भौगोलिक मानांकन किंवा पेटंट मिळाले तर ती देशाकरिता मोठी संपदा ठरते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे अधिकाधिक कृषी उत्पादनांचे भौगोलिक मानांकन व पेटंट प्राप्त करून देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे मंगळवारी (दि. 26) जागतिक बौद्धिक संपदा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रो.गणेश हिंगमिरे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भौगोलिक मानांकन प्राप्त करणारे प्रगतिशील शेतकरी व उद्योजक उपस्थित होते.

युरोपीय देश व चीन दरवर्षी हजारोंच्या संख्येने भौगोलिक मानांकन व पेटंट्स प्राप्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने मिशनरी उत्साहाने कार्य केल्यास देश पुनश्च गतवैभव प्राप्त करेल, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गणेश हिंगमिरे यांनी गोमुख येथील गंगाजलाच्या भौगोलिक मानांकनासाठी दाखल केलेला अर्ज राज्यपालांना सादर केला. भौगोलिक मानांकन प्राप्त केलेल्या उद्योजक व शेतकऱ्यांनी यावेळी राज्यपालांना केसर आंबा, बदलापूर जांभूळ व डहाणू चिकू यांच्या भौगोलिक मानांकनांचे तसेच राहुरी येथील कृषी विद्यापीठाने नोंदविलेल्या नानखटाईच्या पेटंटचे प्रमाणपत्र  सादर केले.

००००

World Intellectual Property Day commemorated at Maharashtra Raj Bhavan

Mumbai, Dated 26 : The World Intellectual Property Day was commemorated in presence of Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Tuesday (26 April)

The World IP Day commemoration was organised at the instance of Intellectual Property and Geographical Indication (GI) activisist Prof Ganesh Hingmire.

Speaking on the occasion, Governor Koshyari called for creating awareness about GI registration and patenting among farmers. He said India must strive to enrich its farmers by securing GI registration and patenting of their agricultural produce.

Observing that European Union countries and China register lakhs of their products annually, he said India must work with missionary spirit to get more products GI and patent registered. In this connection he applauded Prof Ganesh Hingmire for resolving to register 75 products under GI and patents in the ongoing year being celebrated as Azadi Ka Amrit Mahotsav.

Agricultural farmers and entrepreneurs presented the certificates of GI registration for Kesar Mangoes, Dahanu Chikoo and Badlapur Jamun to the Governor. The MPKV University Rahuri also presented the patent certificate of the Nankhatai received by it.

०००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.