लेखसामाजिक

संविधान बळकट करण्यासाठी लोकशाहीला मत द्या―हुले

पाटोदा: महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आणि पंडित जवाहरलाल नेहरु हे आधुनिक भारताचे शिल्पकार, हे खरेच ;पण तिसऱ्या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती. डॉ.भीमराव रामजी आंबेडकर अशा उत्तुंग क्षमतेचा आणि कर्तृत्वाचा महापुरुष जगाने आजवर पाहिलेला नाही, जगाच्या इतिहासात हा एकमेव महापुरुष आहे,ज्याने एकाच हयातीमध्ये मनुस्मृती नावाची एक राज्यघटना जाळली आणि त्याच ह्यातीमद्ये दुसरी भारतीय संविधान नावाची राज्यघटना देशाला दिली.
एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना नाकारणे आणि त्याच हयातीत दुसरी राज्यघटना साकारणे हे साधे काम नाही,अशा कामासाठी अनेक पिढ्या खर्ची पडतात, कोणीतरी मार्टिन ल्यूथर किंग 'I Have A Dream'म्हणतो तेव्हा कुठे बाराक ओबामांना येस वी कॅन..!,असे म्हणणे अशक्य होते,बाबासाहेब आंबेडकरांनी ६५ वर्षाच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करून दाखवले, त्यात गांधी नेहरू यांचा विचार करता,सर्वात कमी आयुष्य लाभले ते आंबेडकरांना. पण खडतर वाट कापत बाबासाहेबानी या देशाला देशाला समतेचे संविधान दिले.
मनुस्मृती हीच आपली राज्यघटना आहे असे म्हणणारे वाचालवीर आजही आपण बघत असतो, मनुस्मृतीला आपल्या संस्कृतीसाजे अधिष्ठान मानणारा एक गट आजही दिसतो, विविध प्रकारचे युक्तिवाद वापरून तो मनुस्मृतीचे समर्थन करत असतो. ही अवस्था आज असेल तर बाबसाहेबांनी मनुस्मृती जाळली तेव्हाचे चित्र काय असेल..?
२५डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमद्ये मनुस्मृतीचे दहन झाले,गंगाधर सहस्त्रबुद्धे यांच्या ठरावाणे मनुस्मृती जाळली गेली.गांधीजी आणि पंडित नेहरू कितीही प्रामाणिक आणि लोकहितवादी असले तरीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला भेटेपर्यंत दलितांच्या प्रश्नांची जाणीव त्या तीव्रतेने दोघांनाही झाली नव्हती.नेहरूंना भारत समजून सांगितला तो गांधींनी पण गांधींना खरा भारत समाजला तो बाबसाहेबांमुळेच.
बाबासाहेबांच्या वाट्याला जो विखार आला ,जी विषमता आली ,ती अन्य कोणाच्या वाट्याला आली असती तर त्यांच्या संयमाचा बांध फुटला असता,बाबासाहेब मात्र सम्यक सकारात्मकतेने आणि शास्त्रसुद्धा पद्धतीने उत्तर देत राहिले काम करत राहिले,राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी नक्की काय केले ,ते समजून घेतले पाहिजे, बाबासाहेबांनी केवळ राजकारण नाही केलं ,एका सांस्कृतिला जन्म दिला,आपल्याला बाबासाहेब माहित असतात ते विशिष्ट मुद्यापुरतेच पण किती सर्वंकष पद्धतीचे काम बाबासाहेब करत होते ते समजून घ्यायला पाहिजे.
ज्या बाबासाहेबांनी या भारत देशाला समतेचे संविधान दिले त्याच देशात संविधान जाळुन मनुस्मृतीचे पूजन केले जाते,ही मोठी शोकांतिका आहे,म्हणूनच मला म्हणावेशे वाटते "मनुस्मृतीचं दहन करून समतेच संविधान देणाऱ्या बाबसाहेबांचा हा देश ही ख्याती पुसून मुठभर मनुवाद्यांच्या मानिवाद्यांचा देश व्हावा का हा...?
यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जात धर्म, घराणेशाही, हे मुद्दे बाजूला सारून बाबासाहेबांनी लोकशाहीला दिलेल्या भारतीय संविधानाला बळकट व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी लोकहितवादी पक्षाला आपलं मोलाचं मत देण्याचं आव्हान पाटोदा येथील सामाजिक व वैचारिक क्षेत्रात काम करणारा तरूण दत्ता बळीराम हुले याने केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.