प्रशासकीय

‘महा आवास अभियान २०२०-२१’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 : महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.

1) सर्वोत्कृष्ट विभागप्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :-  कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय.  राज्य पुरस्कृत आवास योजना :-  कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.

2) सर्वोत्कृष्ट जिल्हेप्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :-  गोंदिया – प्रथम, धुळे – द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – द्वितीय,  वर्धा – तृतीय.

3) सर्वोत्कृष्ट तालुकेप्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – द्वितीय, अकोले (जि.अहमदनगर)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर  (जि.जळगाव)- व्दितीय,  कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.

4) सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीप्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय,  बोरगाव (जि.चंद्रपूर)– तृतीय.

5) सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती :  प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोऱ्हाळे (जि.अहमदनगर) – द्वितीय,  निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- चिंचवली (जि.ठाणे)– प्रथम, शिरवली (जि.पुणे)- द्वितीय,  अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.

6) सर्वोत्कृष्ट गृहसंकुलेप्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- खारेकर्दुणे (जि.अहमदनगर)– प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- द्वितीय,  मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.

या व्यतिरीक्त, ‘महा आवास अभियान- 2020-21’ मधील विशिष्ट 10 उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

1) सर्वात जास्त भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- जळगाव – प्रथम, अमरावती – द्वितीय, अहमदनगर – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- गोंदिया – प्रथम, बुलढाणा – द्वितीय,  नाशिक – तृतीय.

2) सर्वात जास्त घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणारे जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोंदिया – प्रथम, भंडारा – द्वितीय, अमरावती – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- उस्मानाबाद – प्रथम, नांदेड – द्वितीय,  बीड – तृतीय.

3) सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणारे जिल्हे  :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोंदिया – प्रथम, नंदूरबार – द्वितीय, भंडारा – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, चंद्रपूर – व्दितीय,  गोंदिया – तृतीय.

4) सर्वात जास्त बहुमजली इमारती उभारणारे जिल्हे : कोल्हापूर – प्रथम, सातारा – द्वितीय, बुलढाणा – तृतीय.

5) सर्वात जास्त गृहसंकुले उभारणारे जिल्हे : वर्धा – प्रथम, सातारा – द्वितीय, गोंदिया – तृतीय.

6) सर्वात जास्त घरकुल मार्ट सुरु करणारे जिल्हे : अमरावती – प्रथम, गोंदिया – द्वितीय, भंडारा – तृतीय.

7) सर्वात जास्त लाभार्थ्यांना वित्तीय संस्थांचे गृहकर्ज मिळवून देणारे जिल्हे : भंडारा – प्रथम, नांदेड – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

8) सर्वात जास्त आदर्श घरांची निर्मिती करणारे जिल्हे : औरंगाबाद – प्रथम, सातारा – द्वितीय, नांदेड – तृतीय.

9) सर्वात जास्त कॉर्पोरेट, स्वयंसेवी आणि सहकारी संस्थांचे सहकार्य घेणारे जिल्हे : पालघर – प्रथम, अहमदनगर – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

10) इतर विशेष उपक्रम : नाशिक – प्रथम, नागपूर – द्वितीय, सांगली – तृतीय.

हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button