‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या डॉ.मधुकर गायकवाड यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. 28 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पाहता येईल. त्यासाठी

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR ही माध्यमे उपलब्ध आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशबरोबरच कोकणचे तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातपासून आपले रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून  दिली आहे.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.