महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

आठवडा विशेष टीम―

अकोला दि.1(आठवडा विशेष)- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हा सोहळा ध्वजारोहण व शानदार संचलनाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,  जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण राजू गुल्हाणे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने यावेळी वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा यांनी परेड निरीक्षण केले. पोलीस, होमगार्ड व विविध पथकांनी शानदार संचालन केले. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा जागर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात खालील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’  राज्यस्तरीय ‘तृतीय पारितोषिकः-  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा सुचना अधिकारी अनिल चिंचोले, अधीक्षक मिरा पागोरे,  समन्वयक गजानन महल्ले.

‘सुंदर माझे कार्यालय’ पुरस्कारः- 1)जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला,2)    उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तीजापूर,3)    तहसिल कार्यालय, पातूर.

‘सुंदर माझा टेबल’ (जिल्हास्तरीय कर्मचारी):1) अव्वल कारकुन अभय पाठक, 2)  आस्थापना शाखा प्रेमा हिवराळे,3)  अव्वल कारकुन शशीकांत देशपांडे,4) नाझर मोहन साठे

(तालुकास्तरीय कर्मचारी)-1) महसूल सहा. कु. उमा गावंडे,तहसिलदार कचेरी अकोला. 2 महसूल सहा. सचिन बागडे, उपविभागीय कार्यालय, मुर्तिजापूर.,3)   अव्वल कारकून उज्वला सांगळे, बार्शीटाकळी तहसिल कार्यालय.

अंजिक्य अडव्हेंचर ग्रुपचे संचालक  धनंजय भगत व त्याच्या चमूस जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.