बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतीनिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. शहरातील सहकार भवन येथे रविवार, दिनांक 14 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोदी यांनी सांगितले की,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानव मुक्तीच्या लढ्याचे प्रेरणास्ञोत आहेत.ज्या काळात बहुजन व वंचित समाजावर अनेक बंधने होती.त्याकाळी क्रांतीची बिजे पेरण्याचे महान कार्य हे बाबासाहेबांनी केले. बहूजन समाजापर्यंत नवा विचार व दृष्टीकोन पोहोचविला.समाजाला तर्क संगत विचार करायला शिकवले. बहुजन समाजासाठी स्वता: वर्तमानपञ काढले.राजकिय भूमिका मांडली. यासोबतच स्वातंञ्यपुर्व काळात व नंतरही महीला,शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी तत्कालीन इंग्रज सरकार समोर मांडले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविला.
महाड येथील चवदार तळ्याचा,नाशिक येथील काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह केला.
डॉ.आंबेडकर हे थोर समाजसुधारक होते. तत्कालीन प्रस्थापीत व्यवस्थेविरुद्ध डॉ.आंबेडकर यांनी मोठा लढा उभारला. साहीत्य लिहीले. समाजातील अस्पृश्य व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका प्राधान्याने डॉ.आंबेडकर यांनी घेतली व समाज सुधारणेची मोठी लोकचळवळ उभी केली.सर्वच क्षेञात मोठे कार्य केले. बाबासाहेबांच्या कार्याची नोंद जगाने घेतली.भारतीय लोकशाहीला बळकट करून देशाली दिशा देण्याचे महान कार्य त्यांनी केले.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब हे त्याकाळी व आजही समाज परीवर्तनाचे प्रेरणास्ञोत आहेत असे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव गांधी पंचायतराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगरसेवक सुनिल व्यवहारे यांनी मानले.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक असेफोद्दीन खतीब, नगरसेवक सुनिल व्यवहारे,माजी नगरसेवक गणेश मसने,सुनिल वाघाळकर,राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित पवार,दिनेश घोडके, शेख मुक्तार,जावेद गवळी,केज विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन जाधव,महेश परदेशी, भरत लखेरा,जावेद गवळी,अनिल औचित्ये सुधाकर टेकाळे,अमोल मिसाळ यासह सर्व कार्यकर्त्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.