ब्रेकिंग न्युज

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत लिंबोटा येथे प्रशांतभैय्या कराड यांच्या प्रयत्नातून लाभार्थ्यांना गॅस वाटप

परळी प्रतिनिधी: दि.18 तालुक्यातील लिंबोटा येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत 16 लाभार्थ्यांना युवक नेते प्रशांत कराड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.प्रितम मुंडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष फुलंचद कराड यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थ्यांना परळी तालुक्यात गॅसचे वाटप करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लिंबोटा येथे 16 लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.
यावेळी युवक नेते प्रशांत कराड, देविदास कराड, माजी सरपंच महादेव कराड, मंचक मुंडे, बालासाहेब कराड, अच्युत कराड, रवी कराड, छत्रगुण मुंडे, भरत तिडके, विजय कराड, वैजनाथ मुंडे, रामप्रभु कराड, गोविंद मुंडे, गोवर्धन मुंडे, सौदागर दोडके, रघुनाथ मुंडे, दिपक मुंडे, संदिप मुंडे, श्रीनिवास मुंडे, राहुल खाडे, परळीच्या वैद्यनाथ गॅस डिस्टयुब्युटर्सचे चेतन श्रीपाद बुरकुले, ज्ञानेश्‍वर चिकणे, रामकिशन सुरवसे, धर्मराज चौधरी उपस्थित होते.भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सतत काहीना काही नवीन कार्य व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचून त्या योजनाचा लाभ देणेचे काम भाजपा युवक नेते प्रशांत कराड नेहमी करत असतात.

लिंबोटा येथील रत्नमाला गोवर्धन मुंडे, संध्या मंचक मुंडे, आशाबाई रामप्रभु कराड, उर्मिला दत्तात्रय मुंडे, राधा अच्युत कराड, सुनिता छत्रगुन मुंडे, शिवाबाई लिंबाजी कराड, अंकिता दादाराव कराड यांच्यासह इतर लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर व शिगडी वाटप करण्यात आले.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.