आठवडा विशेष टीम―
पुणे, दि. 3: राज्य शासनाने दोन वर्षात केलेल्या कामाची, योजना, उपक्रमाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी माहीती व जनसंपर्क विभागाच्या वतीने भरवण्यात आलेले प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
श्री. अनास्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय प्रदर्शनास भेट दिली . ते म्हणाले, राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेली कामगिरी मोजक्या शब्दात मांडण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अनेक योजनांची माहिती
मिळण्यास मदत होणार आहे. असेही ते म्हणाले. शासनाने दोन वर्षात उत्कृष्ट काम केले असून ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी साताऱ्याचे जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली.