दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुंबईतील वरळी सी-फेस येथील कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित केलेल्या सचित्र प्रदर्शनास आज अनेक नागरिकांनी भेट देत हे चित्र प्रदर्शन अत्यंत चांगले असल्याचे सांगितले.

या चित्र प्रदर्शनाचे खूप सुंदर पद्धतीने आयोजन करून खूप कल्पकतेने महाराष्ट्राचे चित्र उभे केले  असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब साळुंखे यांनी दिली आहे. महाविकास आघाडी शासनाने भरीव कामगिरी केली असून या प्रदर्शनाला आणि पुढील वाटचालीस यशवंत गणाचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती येथे आलेल्या प्रत्येकाने जाणून घेतली आणि अभिप्राय नोंद वहीत हे चित्र प्रदर्शन अत्यंत  उत्कृष्ट असल्याचे नमूद केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत  शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे.  या प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.प्रदर्शनस्थळी  प्रदर्शनाबाबत उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. मुंबईतील वरळी सी-फेस येथे  कॉमन मॅन पुतळा परिसरात आयोजित करण्यात आलेले चित्र प्रदर्शन दि ५ मे पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू राहणार आहे.

 

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.